S M L

हात गमावलेल्या कामगाराला कंपनीनं सोडलं वार्‍यावर !

Sachin Salve | Updated On: Dec 9, 2014 08:58 PM IST

हात गमावलेल्या कामगाराला कंपनीनं सोडलं वार्‍यावर !

workar23452309 डिसेंबर : कामावर असताना मशीनमध्ये अपघातात डावा हात गमावलेल्या कामगाराला एका कारखान्यानं वार्‍यावर सोडलंय. सोलापूर जिल्ह्यातील सदगुरू श्री.श्री.इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडनं हा अन्याय केलाय. मशीन ऑपरेटर विजय कुलकर्णी यांचा 1 सप्टेंबर 2014 अपघात झाला होता. मशीनमध्ये अडकून डावा हात मनगटापासून तुटला. तसंच उजव्या हाताची दोन बोटं तुटली. पण कारखान्याचे मालक शंकर शिंदे यांनी अपघाताची जबाबदारी झटकली. पोलिसांनीही केली केस नोंदवून घ्यायला टाळाटाळ केलीय.

विजय वसंत कुलकर्णी. दोन महिने सात दिवसापूर्वी तो देखील आपल्या सारखा सर्वसामान्याप्रमाणे समाजात वावरत होता. पण 1 सप्टेंबर 2014 रोजी त्याला अपघात झाला आणि या अपघातात त्याचा डावा हात आणि उजव्या हाताची दोन बोटे शरीरापासून छाटली गेली. या अपघातामुळे आयुष्यभराचे अपंगत्व आलेल्या विजयाची ही करूण कहाणी.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याच्या माळावरील बचेरी गावातील हे शंकर केशव शिंदे यांचा हा सदगुरू श्री श्री रविशंकर यांच्या नावे सुरू करण्यात आलेला हा पशुखाद्य कारखाना, या कारखान्यात विजय कुलकर्णी आठ महिन्यापूर्वी मशीन ऑपरेटर म्हणून कामाला लागले. आणि नेहमी प्रमाणे आपल्या कामात व्यस्त असताना 1 सप्टेबर 2014 रोजी अचानक त्यांचा हात मशीन मध्ये अडकला. आणि त्या अपघातात विजय यांचा डावा हात मनगटापासून आणि उजव्या हाताची दोन बोटे छाटली गेली. या अपघातानंतर जखमी विजयचे औषध उपचार, पोलीस कारवाई, विमा संरक्षण आदी बाबी तातडीने व्हायला हव्या होत्या पण मागणी करून देखील कारखाना मालकाने दुर्लक्ष केले. पोलिसांनी दबावापोटी केस नोंदविण्यास टाळाटाळ केली. शेवटी या सगळ्या घटनांनी हतबल झाल्यानंतर विजय कुलकर्णी यांनी आयबीएन लोकमतला मेल करून आपल्यावर होत असल्याच्या अन्यायाची व्यथा मांडली. या मेल नंतर आज आयबीएन लोकमतच्या टीमने घटनास्थळी जावून कारखाना, कारखान्याचे मालक आणि पोलिसांशी संपर्क केला.

विजय यांच्या या करूण कहाणी नंतर आमच्या टीमचा मोर्चा पिलीव पोलीस स्टेशनकडे वळला. तिथे हाके नावाचे पोलीस शिपाई सिव्हिल ड्रेसमध्ये बसले होते. त्यांच्याकडे विजय कुलकर्णी यांची फिर्याद का दाखल करून घेतली जात नाही अशी विचारणा केली असता त्यांनी थेट वरिष्ठांना फोन लावला. हाकेच्या म्हणण्यानुसार ही घटना दोन महिन्यापूर्वीची आहे आणि विजय कुलकर्णी त्यांच्याकडे येवून गेल्याचे ते वरिष्ठांना सांगत आहेत. याचा अर्थ कारखाना मालक आणि पोलिस यांचे संगनमत असल्याने कुलकर्णींच्या फिर्यादीला केराची टोपली दाखविली जात आहे. या नंतर टीमचा मोर्चा कारखान्याचे मालक शंकर शिंदे यांचेकडे वळविला.

कामावर असताना विजय कुलकर्णी झोप काढतात असे सांगून शिंदे यांनी अपघाताची जबाबदारी झटकली. या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर उपचार करणारा डॉक्टर, कारखान्याचा मालक आणि पोलीस आदींनी मिळून विजय यांच्यावर अन्याय केला आहे हा अन्याय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूर करतील का आणि अन्याय करणारावर कारवाई करणार का हा खरा प्रश्न आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 9, 2014 08:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close