S M L

मराठवाडावासियांना दिलासा, जायकवाडीचं पाणी रोखण्यास कोर्टाचा नकार

Sachin Salve | Updated On: Dec 10, 2014 02:29 PM IST

मराठवाडावासियांना दिलासा, जायकवाडीचं पाणी रोखण्यास कोर्टाचा नकार

sc_on_jaikwadi_dam10 डिसेंबर : जायकवाडी धरणाला पाणी सोडण्यावरुन मराठवाडा आणि अहमदनगर वाद पेटला आहे. मात्र आज (बुधवारी) सुप्रीम कोर्टाने मराठवाडावासियांना दिलासा दिलाय. जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या हरिश्चंद्र फेडरेशन या संस्थेनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. अहमदनगरमधून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयावर त्यात आक्षेप घेण्यात आलाय. हायकोर्टाने दिलेल्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात अपील दाखल करण्यात आलीय. तसंच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा या संस्थेकडूनही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. आज हरिश्चंद्र फेडरेशनच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिलाय. येत्या सोमवारी पुन्हा या याचिकेवर शेवटी सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे मराठवाड्यातल्या जनतेला काहीसा दिलासा मिळालाय. विशेष म्हणजे जायकवाडीला पाणी मिळावं की नाही यासंदर्भात आतापर्यंत 17 याचिका दाखल झाल्या आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 10, 2014 02:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close