S M L

घृस्णास्पद, मुंबईत एकाच दिवसात 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार

Sachin Salve | Updated On: Dec 10, 2014 10:42 PM IST

rape-victims-10 डिसेंबर : राजधानी दिल्लीत एका टॅक्सीत बलात्काराची घटना ताजी असताना मुंबईत एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराची घृणास्पद घटना घडलीये. माटुंग्यात एका सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आले. तर नालासोपार्‍यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय. या दोन्ही प्रकरणी एकाजणाला अटक करण्यात आली तर एक जण फरार आहे.

मुंबईतील माटुंगा परिसरात शाहूनगरमध्ये एका 19 वर्षाच्या युवकाने 7 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही मुलगी आपल्या आजीसोबत शाहूनगर मध्ये राहते. ती घरी एकटीच आहे हे पाहून या नराधमाने 20 रुपयांचं आमिष देऊन मुलीला आपल्या घरी नेलं. तिथं त्याने त्या मुलीवर जबरदस्ती केली. त्यावेळी ही मुलगी ओरडली. तिचा आवाज ऐकूण शेजारी धावत आले. त्यांनी त्या नराधमास पकडून शाहू नगर पोलिसांच्या हवाली केलं. मुलीला सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मुलीची तब्येत चांगली असून आरोपीवर बलात्कार आणि लहान मुलांचे लैगिक शोषण कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. तर नालासोपार्‍यामध्येही अल्पवयीन मुलीवर बलात्काराची मुलीवर सामूहिक बलात्कार झालाय. ही घटना नालासोपारा पूर्वमध्ये घडलीय. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांत गुन्हा दाखल आहे. पण या प्रकरणातले आरोपी फरार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 10, 2014 03:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close