S M L

शिवसेना तटस्थ राहिल्यामुळे MIM कडे उपमहापौरपद

Sachin Salve | Updated On: Dec 10, 2014 05:53 PM IST

शिवसेना तटस्थ राहिल्यामुळे MIM कडे उपमहापौरपद

malegaon_sena2310 डिसेंबर : महाराष्ट्रात शिरकाव केलेल्या एमआयएम पक्ष नेहमी शिवसेनेच्या निशाण्यावर राहिला आहे. पण मालेगाव महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहिल्यामुळे एमआयएमकडे उपमहापौरपद गेले आहे. तर काँग्रेसचा पराभव करत मालेगावचं महापौरपद तिसर्‍या महाजकडे खेचून मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी विधानसभेतल्या पराभावाचा बदला घेतलाय. मालेगावच्या महापौरपदी तिसर्‍या महाजचे हाजी मोहम्मद इब्राहीम हे विजयी झाले.

मालेगाव महापालिकेच्या महापौरपदाची अत्यंत चुरशीची निवडणूक पार पडली. विधानसभेत काँग्रेसमुळे आपला पराभव झाल्याची सल माजी आमदार मुफ्ती ईस्माईल यांच्या मनात होती. महापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी ती भरून काढली. काँग्रेस आघाडीचे बुलंद इक्बाल यांचा त्यांनी 14 मतांनी पराभव केला. तिसर्‍या महाजचे हाजी मोहम्मद इब्राहीम हे विजयी झाले आहे. त्यांना तिसरा महाज, शिवसेना आणि शहर विकास आघाडी यांची 46 मतं मिळाली. तर, उपमहापौरपदी एमआयएमचे नगरसेवक युनूस ईसा शेख विजयी झाले आहेत. दरम्यान, आपण एमआयएमला मतदान केलं नाही, तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या वेळी तटस्थ राहिलो असं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. एकाप्रकारे सेनेनं तटस्थ राहून एमआयएमला पाठिंबा दिला अशी चर्चा आता रंगलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 10, 2014 05:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close