S M L

सांगलीत रॅगिंगचा बळी ?, शालेय विद्यार्थ्याची आत्महत्या

Sachin Salve | Updated On: Dec 10, 2014 09:11 PM IST

सांगलीत रॅगिंगचा बळी ?, शालेय विद्यार्थ्याची आत्महत्या

sangali_ragging10 डिसेंबर : सांगलीमधल्या पलूसच्या जवाहर नवोदय विद्यालयातल्या दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. दोन दिवसांपूर्वी सचिन जावीर या विद्यार्थ्याने आत्महत्या केलीय. सचिनने रॅगिंगमुळे आत्महत्या केली असा त्याच्या पालकांचा आरोप आहे. तर सचिनने अभ्यासाच्या टेंशनमुळे आत्महत्या केल्याचा शाळेचा दावा आहे.

केंद्र  शासनाच्या  माध्यमातून  पलूस येथील जवाहर नवोदय विद्यालय चालवण्यात येत  आहे. या  विद्यालयातील   दहावीत  शिकणाऱ्या सचिन जावीर या विद्यार्थ्याने दोन दिवसापूर्वी विद्यालयाच्या आवारातच झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. सचिनच्या पालकांनी त्याच्या बॅगेची तपासणी केली असता धक्क्यादायक माहिती समोर आहे. सचिनने त्याच्या बॅगेत ठेवलेले एक पत्र त्याच्या वडिलांना मिळाले असून त्यामध्ये विद्यालयात रॅगिंगचा प्रकार केला जातो असं लिहिलंय. त्याच्या रूममधील इतर मुलांवर होणार्‍या अन्यायाची आणि छळाची निनावी चिट्टी सापडली आहे. या पत्रामध्ये बारावीचे विद्यार्थी नववीच्या विद्यार्थ्यानां मारहाण करतात. तसंच नववीच्या मुलांची ड्रेस ड्युटी असतांना पाणी मिळाले नाही म्हणून मारहाण करणे, रात्री उशिरा स्टडी रूममधून बाहेर आल्यानंतर टाईमपास म्हणून एकाला झोपेतून उठवून रोज मारहाण करणे, नववीच्या चार मुलांची मेस ड्युटी होती. त्यावेळी मेसमध्ये एका सीनिअर विद्यार्थ्याला पाणी प्यायला मिळाले नाही, म्हणून सर्वांनीच लाथा, बुक्क्या, काठीने चार मुलांना मारहाण केली. अकरावीच्या एका विद्यार्थ्याने, तो आल्यानंतर नाष्टा करायला येणार्‍या प्रत्येक नववीच्या विद्यार्थ्याला मारहाण करण्याचा स्वत:चा नियम तयार केला आहे. तसंच रात्री दहा वाजता इयत्ता 12 वीचा एक विद्यार्थी रात्री स्टडीरूममधून बाहेर आल्या नंतर टाईमपास म्हणून एकाला झोपेतून उठवून रोज विधार्थ्याना मारहाण करतो.या सारखे प्रकार होत, असल्याचा मजकूर त्याने चिठीत लिहिला आहे.

त्यामुळे रॅगिंग मुळेच सचिनने आत्महत्या केली आहे, आसा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. या प्रकरणी नातेवाईक आणि सामाजिक संघटना यांनी पलूस पोलीस ठाण्यात तक्रार आणि निवेदन दिले आहे. दरम्यान, विद्यालयाने मात्र सचिनचा घातपात नसून केवळ अभ्यासाच्या टेन्शनमुळेच आणि वैयक्तिक कारणामुळे आत्महत्या केली आहे असे सांगितले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 10, 2014 09:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close