S M L

वनहक्काला वाळवी; नाशिकमध्ये आदिवासींचं ठिय्या आंदोलन

Samruddha Bhambure | Updated On: Dec 11, 2014 02:49 PM IST

वनहक्काला वाळवी; नाशिकमध्ये आदिवासींचं ठिय्या आंदोलन

11 डिसेंबर : नंदुरबारमध्ये वनहक्क कायद्याची अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या उदासीन आणि निष्काळजी कारभारामुळे आदिवासी बांधवांच्या फायलींना वाळवी लागली आहे. त्यामुळे वनहक्क जमिनींसाठी जे दावे दाखल केलेत त्याचे दस्त आणि पुरावे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

प्रशानच्या या बेफिकीर वृत्तीमुळे आदिवासींमध्ये संतापाचं वातावरण आहे. लोकसंघर्ष मोर्चाच्या आदिवासी बांधवांनी याविरोधात गुरुवारी नाशिकच्या आदिवासी आयुक्तांना घेराव घातला. त्यांनी आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे.

प्रकल्प अधिकारी जोपर्यंत आयुक्तांच्या कार्यालयात येत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार या आदिवासींनी व्यक्त केला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 11, 2014 02:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close