S M L

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

Sachin Salve | Updated On: Dec 11, 2014 05:45 PM IST

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

deelip kumar11 डिसेंबर : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना लीलावती रुग्णालयातून आज (गुरुवारी) डिस्चार्ज देण्यात आलाय. पाच दिवसांपूर्वी न्यूमोनिया झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

पाच दिवसांच्या उपचारानंतर आता त्यांची प्रकृती चांगली असल्याचं सांगत डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिलाय.

विशेष म्हणजे आज दिलीपकुमार यांचा 92 वा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी आज लीलावती हॉस्पिटलबाहेर त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 11, 2014 03:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close