S M L

26/11 चा कट लष्करनेच आखला : पाकने केलं मान्य

18 जुलै मुंबईवरील हल्ल्याचा कट लष्कर ए तोएबानंच आखला होता आणि तोही पाकिस्तानमधूनच असं पाकिस्ताननं मान्य केलंय. पाक अध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान यांच्यात इजिप्तमध्ये झालेल्या बैठकीत पाकनं हे मान्य केलं. पाकिस्ताननं भारताकडं 26/11 चा ऍक्शन टेकन रिपोर्ट सोपवलाय. त्याची एक्सक्लुजिव माहिती नेटवर्क-18ला मिळाली आहे. त्यात लष्करच्या झकी-उर-रहमान-लख्वी आणि चार इतर अतिरेक्यांची नावं आहेत. हे पाच जण सध्या अटकेत आहेत. तर इतर 13 जणांनाही गुन्हेगार ठरवण्यात आलंय. ज्या पाच जणांच्या नावाचा रिपोर्टमध्ये उल्लेख आहे, त्यावर एक नजरहम्माद अमिन सादिक : मुंबई हल्ल्यासाठी निधी उभारणं आणि अतिरेक्यांना लपण्यासाठी जागा देण्याचा आरोप याच्यावर आहे. झकी-उर-रेहमान लख्वी : हा लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक आणि जमात-उद- दावाचा प्रमुख आहे. मंुबई हल्ल्याचा तो मास्टरमाईंड आहे. मझहर इक्बाल : मुंबई हल्ल्यातल्या अतिरेक्यांची देखभाल यानं केली.शाहीद जमील : अल हुसैनी जहाजातला एक कर्मचारी. या जहाजातूनच अतिरेकी कुबेर बोटीपर्यंत आले होते. पण 26/11 तल्या या आरोपींच्या खटल्याला अजून सुरुवात झालेली नाही. याच आठवड्यात हा खटला सुरू होणार होता. पण आता तो 25 जुलैपर्यंत स्थगित करण्यात आलाय. मुंबई हल्ल्याचे मास्टरमाईंड समजल्या जाणा-या आरोपींविरोधात अजून चार्जशीटही दाखल करण्यात आलेली नाहीय. शनिवारी खटला सुरू होण्यापूर्वीची काही प्रक्रिया पार पडली. बचावपक्षाच्या वकीलांनी आरोपींची भेट घेतली. या खटल्याची सुनावणी कडक सुरक्षा व्यवस्थेत रावळपिंडीतल्या आदियाला जेलमध्ये होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 18, 2009 03:26 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 18, 2009 03:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close