S M L

सिंचन घोटाळा : अजित पवार, तटकरेंच्या मागे चौकशीचा फेरा

Samruddha Bhambure | Updated On: Dec 12, 2014 01:22 PM IST

सिंचन घोटाळा : अजित पवार, तटकरेंच्या मागे चौकशीचा फेरा

12 डिसेंबर :   माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याविरुद्धच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता अजित पवार आणि सुनील तटकरेंच्या मागे चौकशीचा फेरा लागणार आहे.

सिंचन घोटाळ्याप्रकरणी आज (शुक्रवारी) मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात महत्त्वाची सुनावणी सुरू झाली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे आगामी काळात अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात आरोप झाले होते. या दोन्ही माजी मंत्र्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी व्हावी, अशी मागणी झाली होती. खुल्या चौकशीस परवानगी मिळावी म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गृह खात्याकडे प्रस्ताव पाठविला होता. आता मुख्यमत्र्यांनी त्या सर्व फाईल्स क्लिअर केल्याने लवकरच दोघांची चौकशी होणार आहे.

दूध का दूध और पानी का पानी होऊ द्या -सुनील तटकरे

आपण कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी दिली. केव्हातरी अग्निदिव्याला सामोरे जायचेच होते. या चौकशीतून सत्य काय ते बाहेर येईल. आता दूध का दूध और पानी का पानी होऊन जाऊ द्या, असेही ते म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 12, 2014 01:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close