S M L

'डीडीएलजे' नाबाद 1000 आठवडे!

Samruddha Bhambure | Updated On: Dec 12, 2014 01:59 PM IST

'डीडीएलजे' नाबाद 1000 आठवडे!

12 डिसेंबर :  बडे बडे शहरों मै ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है सेनोरिटा... हा डायलॉग ऐकला की डोळ्यासमोर येते ती राज आणि सिमरनची एवरग्रीन रोमॅन्टीक जोडी. 90च्या दशकातील प्रचंड गाजलेला रोमॅन्टीक ड्रामा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमाला आज तब्बल 1000 आठवडे पूर्ण होत आहेत. शाहरूख खान आणि काजोलची प्रमुख भूमिका असलेला 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' 1995 मध्ये रिलीज झाला होता. 'राज'च्या भूमिकेत शाहरुख आणि 'सिमरन'च्या भूमिकेतील काजोल यांची त्यावेळी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रियता होती.

आजही हा चित्रपट चाहत्यांच्या मनात घर करून आहे. विशेष म्हणजे 20 ऑक्टोबर 1995 रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा सलग 19 वर्षांपासून मुंबईच्या 'मराठा मंदिर' थिएटरमध्ये अजूनही सुरू आहे. तेव्हापासून आजतागायत या चित्रपटाचा 'मॅटिनी शो' येथे सुरू आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील दंतकथा बनून राहिलेल्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा चित्रपट या आठवड्यात एक नवा विक्रम प्रस्थापित करणार आहे.संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट ठरला होता. 'दिलवाले दुल्हनियौं' ने सलग 19 वर्षे चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याचा नवा विक्रम प्रस्थापित करत, त्याची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये नोंद होण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 12, 2014 01:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close