S M L

मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाची हजेरी

Sachin Salve | Updated On: Dec 13, 2014 03:13 PM IST

marathvada rain13 डिसेंबर : उत्तर महाराष्ट्रापाठोपाठ मुंबईलाही अवकाळी पावसाने झोडपून काढले. मुंबईसह राज्यात शुक्रवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबई आणि उपनगरात अवकाळी पावसाने मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. पुण्यात अवकाळी पावसामुळे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करावा लागला.तर दुसर्‍या दिवशीही उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा बसलाय. नाशिक जिल्ह्यातल्या 20 हजार हेक्टर शेतीला फटका बसला आहे. गारपीटीमुळे द्राक्ष, डाळिंब आणि कांदा पिकाचं मोठ्ठं नुकसान झालंय. नुकसानीचा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. मनमाड, देवळामध्ये डाळिंब, निफाड आणि दिंडोरीमध्ये द्राक्ष तर सटाणा, चांदवड आणि नांदगावमध्ये कांद्याचं अतोनात नुकसान झालंय. येवला तालुक्यातल्या भाटगाव गायके वस्तीत गारपिटीमुळे मेंढ्या, बकर्‍या, कोंबड्या मृत्युमुखी पडल्यात. निफाडलाही गारपिटीचा फटका बसलाय. दरम्यान, राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ आज गारपीटग्रस्तांना भेट देणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 13, 2014 01:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close