S M L

भारत जिंकता जिंकता हरला, ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी

Sachin Salve | Updated On: Dec 13, 2014 01:30 PM IST

भारत जिंकता जिंकता हरला, ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी

13 डिसेंबर : हाताशी आलेला विजय पराभवात होणं हे भारताच्या नशिबी अनेक वेळा आलं आणि आजही ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऍडलेड पहिल्या कसोटीत भारतासोबत तेच झालं. कॅप्टन विराट कोहलीच्या धडाकेबाज सेंच्युरी ठोकूनही भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं. ऑस्ट्रेलियाने भारताचा 48 रन्सने पराभव करत कसोटी सामन्यात 1-0ने आघाडी घेतलीये.

पहिल्या इनिंगमध्ये दणदणीत बॅटिंग करत ऑस्ट्रेलियानं 517 रन्सचा डोंगर उभारला. डेव्हिड वॉर्नर, मायकल क्लार्क आणि स्टीव्हन स्मिथच्या शानदार सेंच्युरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं मोठा स्कोर उभारला. तर भारतानंही पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाला चोख उत्तर दिलं. कॅप्टन विराट कोहलीच्या धुवाँधार सेंच्युरीच्या जोरावर टीम इंडियानं 444 रन्स केले. तर दुसर्‍या इनिंगमध्ये पुन्हा एकदा डेव्हिड वॉर्नरचा धडाका चालला. पहिल्या इनिंगमध्ये 145 रन्स ठोकल्यानंतर वॉर्नरनं दुसर्‍या इनिंगमध्येही 102 रन्स करत शानदार सेंच्युरी केली. आणि भारतासमोर 364 रन्सचं टार्गेट ठेवलं. टीम इंडियानं सुरुवात तर चांगली केली. पण वॉर्नरप्रमाणेच कॅप्टन कोहलीनं दुसर्‍या इनिंगमध्ये सेंच्युरी ठोकत भारताला विजयाच्या आशा दाखवल्या. पण मुरली विजय 99 रन्सवर आऊट झाला आणि त्यानंतर भारताची इनिंग गडगडली. भारताच्या झटपट विकेट गेल्या आणि जिंकता जिंकता भारतानं पहिली टेस्ट गमावलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 13, 2014 01:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close