S M L

यवतमाळमध्ये दोन शेतकर्‍यांची आत्महत्या

Sachin Salve | Updated On: Dec 13, 2014 02:46 PM IST

यवतमाळमध्ये दोन शेतकर्‍यांची आत्महत्या

farmer suicide13 डिसेंबर : नापिकी आणि दुष्काळामुळे शेतकर्‍यांचं आत्महत्येचं सत्र सुरूच आहेत. यवतमाळमध्ये दहेलीमधले तरुण शेतकर्‍यानं गळफास घेऊन आत्महत्या केलीय. मोरेश्वर चौधरी असं या शेतकर्‍याचं नाव आहे. तर यवतमाळमधल्याच पाडवेच्या तुळसाबाई मून या 65 वर्षीय शेतकरी महिलेनंही नापिकीमुळे आत्महत्या केलीये.

अस्मानी संकटाने खचलेला शेतकर्‍याने आत्महत्येचा मार्ग पत्कारलाय. यवतमाळमध्ये दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची घटना उघड झालीये. मोरेश्वर चौधरी या तरुण शेतकर्‍यांना आत्महत्या केलीये. 6 वर्षांपूर्वी चौधरींच्या वडिलांनीही नापिकीमुळे आत्महत्या केली होती. त्यानंतर त्या धक्क्यातून सावर मोरेश्वर चौधरीनी आपली तीन एकर शेती चांगल्या प्रकारे सांभाळून बरे दिवस आणले होते. पण गेल्या चार वर्षांपासून शेतीनं त्यांना चांगलाच धोका दिला. डोक्यावरचा कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि अखेर वडिलांप्रमाणेच विष पिऊन त्यांनी आपलं आयुष्य संपवलं. शेतीपायी नवरा आणि मुलगा गमावणार्‍या मोरेश्वर यांच्या आईच्या तोंडून तर अतीव दु:खानं शब्द सुद्धा उमटत नाहीये. सून आणि दीड वर्षाच्या नातीला घेऊन पुढे कसं जगायचं हा प्रश्न त्यांना सतावतोय. तर दुसरीकडे यवतमाळमधल्याच पाडवेच्या तुळसाबाई मून या 65 वर्षीय शेतकरी महिलेनंही नापिकीमुळे आत्महत्या केलीये. त्यांनी कापूस आणि सोयबीनची लागवड केली होती. त्यासाठी 66 हजार रुपयांचं कर्जही घेतलं होतं. मात्र हाती काहीच न आल्यानं कर्ज कसं फेडायचं या विवंचनेतून या वृद्ध महिलेनं विषारी औषध पिऊन आत्महत्या केलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 13, 2014 02:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close