S M L

आघाडी सरकारमुळे दुष्काळ पाचवीला पुजलेला -मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Dec 13, 2014 06:14 PM IST

cm fadanvis13 डिसेंबर : आधीच्या सरकारांचे नियोजन चुकले म्हणून दुष्काळ पाचवीला पुजलेला अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस हे नागपूरकडे रवाना होण्यापूर्वी नांदेड विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.

सरकारने नुकतेच शेतकर्‍यांसाठी 7 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. त्याचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. आजवर दुष्काळाबाबत पूर्वीच्या सरकारने 8 हजार कोटी रुपये खर्च केले आणि शेतीच्या विकासावर केवळ 2 हजार कोटी रुपये खर्च केले म्हणून दुष्काळ हा पाचवीला पूजलाय पण आमचे सरकार शाश्वत सिंचन शेतीची संधी उपलब्ध करून देणार आहे दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 13, 2014 06:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close