S M L

बारामतीकरांचा अजित पवारांवर जमीन हडपण्याचा आरोप

Sachin Salve | Updated On: Dec 13, 2014 09:57 PM IST

बारामतीकरांचा अजित पवारांवर जमीन हडपण्याचा आरोप

13 डिसेंबर : बारामतीमध्ये कार्‍हाटी गावात कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेची जमीन गिळंकृत करण्याचा राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचा डाव असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. याविरोधात गावकर्‍यांनी ठराव मंजूर केला असून आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

बारामतीपासून 20 किलोमीटर अंतरावरच्या कार्‍हाटीच्या गावकर्‍यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांविरोधात आज विशेष ग्रामसभेत एक ठराव मंजूर केलाय. अजित पवारांवर कार्‍हाटी गावकर्‍यांनी आरोप केलाय. कार्‍हाटी कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेची जमीन गिळंकृत करण्याचा अजित पवारांचा डाव असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला. विद्या प्रतिष्ठानकडून 73 एकर जमीन गिळंकृत करण्याचा प्रयत्न असल्याचं या गावकर्‍यांचं म्हणणं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कार्‍हाटी कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. जर वेळ पडली तर उपोषण करु पण आपली जमीन परत मिळवूच असा निर्धार या गावकर्‍यांनी केलाय. गेल्या वर्षी अजित पवार या संस्थेवर आले आणि त्यांनी 73 एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न केला असा आरोप या गावकर्‍यांनी केलाय. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने, शासकीय अधिकार्‍यांच्या संगनमताने ही जमीन हडपण्यात आलीय, ती परत करावी, असा ठराव त्यांनी केलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 13, 2014 06:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close