S M L

अहमदनगरलाही अवकाळी पावसाचा तडाखा, पिकं पाण्यात !

Sachin Salve | Updated On: Dec 13, 2014 10:21 PM IST

hailstorm in maharashtra (12)13 डिसेंबर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात सलग दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचा आणि गारपीटीचा फटका बसलाय. शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून पिकं मातीमोल झालीये. तर कुंभारी इथं एक तरूण गोदावरी नदीपात्रात वाहून गेल्याची घटना घडलीये.

उत्तरमहाराष्ट्रापाठोपाठ अवकाळी पावसाने अहमदनगर जिल्ह्यालाही झोडपून काढले. नगर जिल्ह्यातील कोपरगाव इथं शुक्रवारी सायंकाळी साडेचार ते साडेपाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील चासनळी, हंडेवाडी, मोर्वीस, धामोरी, माहेगांव देशमुख, कोळपेवाडी, मायगांवदेवी, सांगवीभुसार, कुंभारी येथे अनेक ठिकाणी मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले तर अनेकांच्या घरांचे, गायींच्या गोठ्याचे पत्रे उडाले. शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. डाळींब, पेरू, गहू, हरभरा, ज्वारी पिकांचे प्रचंड नुकसान झालंय. तर कुंभारी इथं बाळासाहेब जाधव हा मुलगा वार्‍यामुळे गोदावरी पात्रात वाहून गेला आहे. ग्रामस्थ आणि नातेवाईक बाळासाहेब जाधवच्या गेल्या दोन दिवसांपासून शोध घेत आहे मात्र अजूनही त्याचा अजून तपास लागलेला नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 13, 2014 10:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close