S M L

ऑनलाईन प्रवेशाचा गोंधळ अजूनही सुरुच

22 जुलैअकरावी ऑनलाईन प्रवेशाचा रोज सुरु असलेला गोंधळ नव्या टप्प्यावर आलाय. आता चार ऑगस्टपासून मॅन्युअल ऍडमिशन्स सुरू होणार आहेत. शिक्षण विभागानंच दिलेल्या माहितीनुसार पहिल्या प्रवेश फेरीची मुदत संपली तरीही चाळीस हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश घेतलेला नाही. नियमानुसार पहिल्या प्रवेश फेरीनंतर दिलेल्या मुदतीत प्रवेश न घेतल्यास विद्यार्थी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेतूनच बाद होणार आहेत. परंतु एवढ्या मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यानं, शिक्षण विभागापुढं नवा पेच निर्माण झालाय. त्यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षण मंडळाची बैठक पुण्यात सुरु आहे. तर दुसरीकडं ऑनलाईन अर्जच न केलेल्यांची संख्याही आता पुढं आलीय. त्यामुळं तिसरी कटऑफ लिस्ट लागल्यानंतर उर्वरित जागांवर मॅन्युअल ऍडमिशन दिली जाईल, अशी माहिती मुंबई शिक्षण विभागाचे सहाय्यक संचालक एन.बी. चव्हाण यांनी दिली.पहिल्या कट ऑफ लिस्टमध्ये नावं जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचा मंगळवारचा शेवटचा दिवस होता. ही मुदत खरंतर एक दिवसाने वाढवण्यात आली होती. पण अजूनही ब•याच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना एक ऑगस्टला जाहीर होणा-या शेवटच्या कट ऑफ लिस्टमध्ये प्रवेश द्यायचा का, यावर विचार सुरु आहे. याशिवाय मॅनेजमेंट कोटा आणि मायनॉरिटी कोट्यात 41 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळेही पहिल्या कट ऑफचे विद्यार्थी प्रवेशासाठी आले नसतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. पहिली प्रवेश फेरी संपल्यानंतर 46,745 विद्यार्थी प्रवेशापासून दूरच राहिलेले आहेत. त्याच्या कारणांचा शोध शिक्षण विभाग आता घेत आहे. पहिल्या कट ऑफ लिस्टमध्ये एक लाख 23 हजार 803 विद्यार्थ्यांची नावं होती. पण त्यापैकी फक्त 77 हजार 58 जणांनी प्रवेश घेतला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शेवटच्या कट ऑफ लिस्टमध्ये ऍडमिशन घेण्याची संधी देण्याचा विचार सरकार करत आहे.ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ थांबवा किंवा पूर्वीची ऍडमिशन पध्दत सुरु करा आणि नाहीतर आम्हाला शिक्षणसंस्था बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल असा कठोर इशारा विवा शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यंानी दिला आहे. विज्ञान शाखेत प्रवेश हवा होता त्यांना वाणिज्य तर वाणिज्य शाखेत जाऊ इच्छिणा•यांना कला शाखेत प्रवेश देण्यात आला आहे. विद्यार्थांच्या गुणवत्तेचा विचार केलेला नसून गुणवत्ताधारक विद्यार्थांऐवजी रिपीटर्सना प्रवेश दिला असल्याचा ठाकूर यांनी आरोप केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 22, 2009 02:35 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2009 02:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close