S M L

असंस्कृत वर्तन करणारे 'ते' दोन पाकिस्तानी खेळाडू निलंबित

Samruddha Bhambure | Updated On: Dec 14, 2014 08:36 PM IST

असंस्कृत वर्तन करणारे 'ते' दोन पाकिस्तानी खेळाडू निलंबित

14 डिसेंबर : चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीच्या सेमिफायनल सामन्यात भारताविरुद्ध असंस्कृत शेरेबाजी आणि हावभाव करणार्‍या पाकिस्तानच्या खेळाडूंपैकी दोघांना निलंबित करण्यात आले आहे. मोहम्मद तौसिक आणि अली अमजद अशी त्या दोघांची नावे आहेत. या दोघांनाही जर्मनीविरुद्धच्या फायनलमध्ये खेळता येणार नाही.

भुवनेश्वरमध्ये झालेल्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानी संघाने भारतावर 4-3 असा पराभव करीत फायनलमध्ये धडक मारली. पण, मॅच जिंकल्यानंतर या खेळाडूंनी भारतीय प्रेक्षकांसमोर अतिशय असभ्य आणि असंस्कृत वर्तन केलं. त्यांनी आपल्या जर्सीज काढल्या. प्रेक्षकांकडे पाहून असंस्कृत शेरेबाजी केली. अश्लील हातवारेही केले. पाकिस्तानी खेळाडूंच्या या असंस्कृत वर्तनाबद्दल त्यांच्या हॉकी संघाचे कोच शाहनाज शेख यांनी भारताची माफी मागितली आहे. पण ही माफी भारताने फेटाळली आहे. या सर्वप्रकाराचा भारताने तीव्र निषेध केला होता.

भारताने इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनची मॅच आयोजित करायलाही नकार दिला होता. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन कारवाई करत नाही तोवर पाकिस्तानबरोबर कुठलीही मॅच खेळणार नाही, अशी कठोर भूमिका भारताने घेतली होती. त्यानंतर पाकिस्तान हॉकी फेडरेशनने मोहम्मद तौसिक आणि अली अमजद या दोन खेळाडूंना फायनल मॅचमधून निलंबित केलं आहे. इतकंच नाही तर फायनलमध्ये पाकिस्तानचे खेळाडू मैदानात पुष्पगुच्छ घेऊन येणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 14, 2014 07:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close