S M L

सर्व गारपीटग्रस्त भागातल्या शेतींचे पंचनामे करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Samruddha Bhambure | Updated On: Dec 15, 2014 02:31 PM IST

सर्व गारपीटग्रस्त भागातल्या शेतींचे पंचनामे करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

15 डिसेंबर : गारपीटग्रस्त शेतकर्‍यांसाठी आज हिवाळी अधिवेशनात विशेष पॅकेजची घोषणा होणार आहेत. त्यासाठी सर्व गारपीटग्रस्त भागातल्या शेतांचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आज घोषणा केली. विधिमंडळात सध्या गारपिटीवर चर्चा सुरू असून गारपीटग्रस्तांना भरीव मदत जाहीर करण्याची सर्वपक्षीय आमदारांची मागणी केली आहे.

काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गारपीटग्रस्त भागाच्या दौर्‍यादरम्यान तात्काळ पॅकेजची घोषणा करण्याचं आश्वासनं दिलं होतं. त्यानुसार नागपूर अधिवेशनात आज मुख्यमंत्री काय घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लगलं आहे.

गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या मदतीसाठी जे काही करणं शक्य आहे, ते सर्व काही करण्यास राज्य सरकार कटीबद्ध असून यासंदर्भातील निर्णय सोमवारी नागपूर अधिवेशनात जाहीर करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली होती. सरकार नुकसानग्रस्तांच्या पाठीशी असून मदतीसाठी प्रसंगी कर्ज काढू, असा विश्वास त्यांनी दिला होता. मुख्यमंत्र्यांनी रविवारी जिल्ह्यातील गारपिटीसह अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी ठिकठिकाणच्या बैठकांमध्ये मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 15, 2014 01:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close