S M L

मुंबई सेंट्रल परिसरातल्या इमारतीला लागलेली आग आटोक्यात

Samruddha Bhambure | Updated On: Dec 15, 2014 02:48 PM IST

मुंबई सेंट्रल परिसरातल्या इमारतीला लागलेली आग आटोक्यात

15 डिसेंबर : मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील एका 15 मजली रेल्वे क्वार्टर्सच्या इमारतीला भीषण आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाच्या जवाणांणा यश आलं आहे.

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील मराठा मंदिरच्या मागच्या बाजूला ही इमारत आहे. रेल्वे कर्मचार्‍यांची वसाहती असलेल्या या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली होती. दरम्यान, अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांच्या मदतीने आग विझवण्यात जवाणांणा यश आलं असून यात 60 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे तर एक रहिवासी किरकोळ जखमी झाला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 15, 2014 01:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close