S M L

केळकर समितीचा अहवाल लवकरच विधिमंडळात

Sachin Salve | Updated On: Dec 15, 2014 04:48 PM IST

केळकर समितीचा अहवाल लवकरच विधिमंडळात

vijay_kelkar215 डिसेंबर : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.विजय केळकर समितीचा अहवाल सरकार लवकरच विधिमंडळात मांडणार आहे. प्रादेशिक असमतोल आणि अनुशेषासंबंधीचा हा अहवाल आहे. अनुशेषाची सविस्तर चर्चा कऱणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत केलीय. मात्र, या अहवालावरून पुन्हा एकदा प्रादेशिक अस्मितेचा वाद पेटण्याची चिन्हं आहेत.

राज्याच्या प्रादेशिक असमतोलाचा सर्वांगिण अभ्यास करून शिफारशी देण्यासाठी तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने 2012मध्ये डॉ. विजय केळकरांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली. दीड वर्ष अभ्यास करून या समितीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे हा अहवाल सादर केला होता. या अहवालामध्ये प्रादेशिक असमतोल आणि अनुशेषाबाबतची वस्तुस्थिती मांडण्यात आलीय. तसंच प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठीच्या शिफारशीसुद्धा करण्यात आल्या. या अहवालाच्या निमित्ताने प्रादेशिक विकासाबाबत राज्य सरकारला आपल्या ध्येय धोरणामध्ये आणि अंमलबजावणीमध्ये आमूलाग्र बदल करावा लागणार आहे. पण, या अहवालामध्ये पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ आणि मराठवाडा हा वाद नव्याने पेटवण्याची बीजं रोवली गेली आहेत. त्यामुळे गेल्या आघाडी सरकारनं हा अहवाल विधिमंडळात न मांडता तो दडवून ठेवल्याचा आरोप आधीच भाजप नेत्यांनी केला होता. म्हणूनच की, काय सत्तेवर येताच देवेंद्र फडणवीस सरकारनं विजय केळकर समितीच्या अहवालाचं सादरीकरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बघितलं आणि त्यानंतर हा अहवाल विधिमंडळात मांडण्याचा निर्णय घेतला.

केळकर समितीच्या शिफारसी

- विकासाचा प्रादेशिक अनुशेष हटवण्यासाठी धोरणात्मक निकषात बदल करावा

- मागासलेल्या भागात निधीची तरतूद, वाटप आणि विनियोगासंबंधी नवी धोरणं असावीत

- मानव विकास निर्देशांक हेच मागासलेपणाचं नवं निर्देशक असावं

- विकासाचं मूल्यमापन प्रादेशिक किंवा विभागवार किंवा तालुकानिहाय न करता जिल्हावार करावं

- प्रादेशिक अर्थसंकल्प तयार करण्यासाठी वैधानिक विकास महामंडळांना अधिकचे अधिकार प्रदान करावेत

- वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद राज्यपालांकडे तर कार्यकारी प्रमुखपद मुख्यमंत्र्यांकडे सोपवावं

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 15, 2014 04:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close