S M L

येत्या शिवजयंतीला होणार शिवस्मारकाचं भूमिपूजन

Sachin Salve | Updated On: Dec 15, 2014 05:26 PM IST

shivsamarak15 डिसेंबर : येत्या शिवजयंतीला म्हणजेच 19 फेब्रुवारीला मुंबईतील अरबी समुद्रात नियोजित छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे.

मुंबईत अरबी समुद्रात नियोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 4 डिसेंबर रोजी हिरवा कंदील दिला. त्यामुळे स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. आमच्याकडून आम्ही परवानगी दिली असून आता राज्य सरकारने पुढील कामगिरी निभावावी असं केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. अखेरीस राज्य सरकारने पुढचे पाऊल उचलत शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी 19 फेब्रुवारी शिवजयंतीचा मुहूर्त साधला आहे. त्यामुळे शिवप्रेमींसाठी ही एक मोठी भेट ठरणार आहे. मात्र अरबी समुद्रातलं शिवस्मारक याचा आराखडा आघाडी सरकारनं आखला होता. आता हाच आरखडा भाजप सरकार कायम ठेवणार का हे पाहावं लागेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 15, 2014 05:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close