S M L

मुंबईत अल्पवयीन मुलीवर गँगरेप : चार जण ताब्यात

25 जुलैअंधेरीमध्ये एका विद्यार्थीनीवर गँगरेप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी चार जणांना अटक करण्यात आली. हे चारही जण कॉलेजचे विद्यार्थी आहेत. महत्वाचं म्हणजे हे चारही जण मनसेचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे. या आरोपींना 28 जुलैपर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यातला गणेश गटकल हा एमआयडीसी भागातला शाखा प्रमुख आहे. या चौघांना 28 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.. मिळालेल्या माहितीनुसार, बलात्कारीत मुलगी आणि तिच्या बहिणीचं अपहरण करण्यात आलं होतं. पण पिडित मुलीची बहिण पळून जाण्यात यशस्वी ठरली. मुलींची MMS क्लीपही या मुलांकडं पोलिसांना सापडली आहे. याप्रकरणी आता अधिक तपास पोलिस करतायत. अंधेरी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये या मुलांविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आलाय. अंधेरीमधील गेल्या दोन महिन्यातील दुसरी घटना आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 25, 2009 12:15 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2009 12:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close