S M L

छेडछाडीला कंटाळून शालेय विद्यार्थिनीची आत्महत्या

Sachin Salve | Updated On: Dec 15, 2014 11:45 PM IST

छेडछाडीला कंटाळून शालेय विद्यार्थिनीची आत्महत्या

suicide343415 डिसेंबर : नाशिकमध्ये मनमाडजवळ गिरणारे गावात एका दहावीतल्या मुलीनं आत्महत्या केल्याची घटना घडलीये. छेडछाडीला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याचा तिच्या नातेवाईकांचा आरोप आहे. प्रियांका गोसावी असं या विद्यार्थिनीचं नावं आहे. तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत 2 मुलं आणि त्यांना मदत करणार्‍या एका मुलीच्या नावाचा उल्लेख केलाय. या प्रकरणी देवळा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केलीय.

मनमाडजवळील गिरणारे येथील सरस्वती विद्यालयात प्रियांका दहावीत शिकत होती. गेल्या काही महिन्यापासून शाळेच्या बाहेरील 2 मुले तिची छेड काढत होते तर त्यांना तिच्याच वर्गात शिकणारी विद्यार्थिनी मदत करत होती. या छेडखानीला कंटाळून अखेर प्रियांका हिने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली .

तिने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली असून त्यात अर्चना खैरनार ,राकेश खैरनार आणि ज्ञानेश्वर दिनकर यांच्या नावांचा उल्लेख आहे. पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. चिठ्ठीत ज्यांची नावे आहेत त्यांना अटक करण्याची मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 15, 2014 11:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close