S M L

अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म

Sachin Salve | Updated On: Dec 16, 2014 08:42 PM IST

अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म

16 डिसेंबर : अकोल्यामध्ये एका अल्पवयीन मुलीने एका लहानगीला जन्म दिल्याची घटना घडलीय. धक्कादायक म्हणजे या अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र बहिणीच्या नवर्‍यानं अत्याचार केल्याचं उघड झालंय. ही घटना घडूनही हॉस्पिटल प्रशासनानं चार दिवसांनी पोलिसांनी माहिती दिली पण तरीही पोलिसांनी या तक्रारीची दखल घ्यायला आणखी चार दिवस टाळाटाळ केली.

पीडितेच्या कुटुंबांतील सावत्र मुलीचा विवाह अमरावती येथील मंगेश जुमळे बरोबर चार वर्षापूर्वी झाला होता. लग्नाच्या दोन वर्षांनंतर जावई मंगेशने अंदाजे 14 वर्ष वयाची सावत्र सालीबरोबर जबरी अत्याचार केला. हा प्रकार नित्याचाच झाल्याने, परिणामी पीडित गर्भवती राहिली. पीडितेचे कुटुंब अमरावती जिल्ह्यातील असल्याने, तिला दर्यापूर येथील एका रुग्णालयात तपासणी नंतर तिला अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिने मुलीला जन्म दिला. मात्र अकोल्यातील रुग्णालय प्रशासनाने चार दिवस याची कल्पना पोलिसांना दिली नाही, की तक्रारही केली नाही. चार दिवसानंतर तक्रार दिल्यावर रामदास पेठ पोलिसांनीही नोंद घेतली नाही. घटना अमरावती जिल्ह्यातील असल्याने इथंही पोलीस स्टेशन हद्दीचा वाद समोर आला. याची नोंद करायला पोलिसांना तब्बल 10 दिवसाचा कालावधी लागला. चार दिवस रुग्णालय प्रशासने तक्रार न केल्याने रुग्णालय प्रशासनावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 16, 2014 08:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close