S M L

केंद्रीय पाहणी पथक आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

Samruddha Bhambure | Updated On: Dec 17, 2014 12:39 PM IST

केंद्रीय पाहणी पथक आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

17 डिसेंबर : दुष्काळ पाहणीसाठी मराठवाडा-विदर्भात दाखल झालेलं केंद्रीय पथक आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहे. अधिवेशनाआधी मुख्यमंत्री आणि केंद्रीय पथकाची बैठक होणार आहे. गावा-गावात जाऊन घेतलेला दुष्काळी परिस्थितीचा आढावा आणि शेतकर्‍यांच्या समस्या ते मुख्यमंत्र्यांसमोर ठेवणार आहेत.

दरम्यान, दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडे भरीव मदत मागितली असल्याचं राज्याचे मुख्यसचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी सांगितलं आहे. आज मुख्य सचिव आणि केंद्रीय पथकाची बैठक झाली. त्यात आणखी काही गावं दुष्काळसदृश्य जाहीर करण्याची केंद्राला विनंती केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 17, 2014 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close