S M L

बॉक्सर सरिता देवीवर एक वर्षाची बंदी

Samruddha Bhambure | Updated On: Dec 17, 2014 02:03 PM IST

बॉक्सर सरिता देवीवर एक वर्षाची बंदी

17 डिसेंबर : भारताची बॉक्सर सरिता देवीनं एशियन गेम्समध्ये मेडल न स्वीकारल्याबद्दल इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनने आज (बुधवारी) त्यांच्यावर एक वर्षांची बंदी घातली आहे. त्यांच्यासोबत भारताचे परदेशी प्रशिक्षक बी. आय. फर्नांडिझ यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

इन्चॉन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे सरिता देवीला रौप्यपदकाला मुकावं लागलं. सेमी फायनलमध्ये दक्षिण कोरियाच्या बॉक्सरविरुद्धच्या मॅचमध्ये अव्वल कामगिरी करुनही सरिता देवीला पराभूत घोषित केलं गेलं होतं. त्यामुळे सरिताने पारितोषिक वितरण समारंभात सरिताने कास्यपदक घ्यायला नकार दिला. यावेळी सरिताला अश्रू अनावर झाले.

या घटनेची इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनने गंभीर दखल घेत तिला यापूर्वी एका वर्षासाठी निलंबित केलं होतं. अखेर आज तिच्यावर एक वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 17, 2014 01:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close