S M L

सेक्स स्कँडलमध्ये नाव असल्याचा आरोप : ओमर अब्दुल्लांचा राजीनामा

28 जुलै,पीडीपी नेते मुझ्झफर बेग यांनी 2006 मधल्या सेक्स स्कँडल प्रकरणात ओमर यांचंही नाव असल्याचा आरोप विधानसभेत केला. त्यामुळे दुखावलेल्या ओमरनी राजीनाम्याची घोषणा केली. सोमवारच्या मेहबुबा मुफ्ती यांच्या हंगाम्यानंतर जम्मू-काश्मीर विधानसभेचा दुसरा दिवसही नाट्यमय ठरला. तीन वर्षापूर्वीच्या सेक्स स्कँडलचं भूत पुन्हा बाटलीतून बाहेर आलं. या स्कँडलच्या सीबीआय चौकशीत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचंही नाव आल्याचा आरोप पीडीपीनं केला. त्यावर नाराज झालेल्या ओमर यांनी थेट राजीनामा देत असल्याची घोषणा केली. जोपर्यंत आपण निर्दोष सिद्ध होत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर राहणार नाही, असं ओमर यांनी जाहीर केलं. नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी ओमर यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ओमरना त्यांच्या जागेवर आणून बसवलंही. पण कुणाचंही ऐकायला ओमर तयार नव्हते. ते उठले आणि तडक विधानसभेच्या बाहेर पडले. प्रत्यक्षात ओमर यांनी आपल्या राजीनामा पत्रात राज्यपालांसाठी पर्याय खुले ठेवले होते. ओमर यांनी म्हटलं आहे की - विरोधकांच्या आरोपांची चौकशी केली जावी. आणि आरोप सिद्ध झाले, तर आपण पद सोडू. राज्यपालांनी ओमर यांचा राजीनामा नामंजूर केला. चौकशी पूर्ण होईपर्यंत ओमर यांनी पदावर राहावं, असं राज्यपालांनी म्हटलंय. दरम्यान, ओमर यांचं नाव कधीच आरोपी म्हणून घेतलं नसल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलंय. ओमर यांना राजीनामा द्यायला भाग पडलेलं हे सेक्स स्कँडल काय आहे, त्यावर एक नजर : जून 2006 मध्ये उघडकीस आलेल्या सेक्स स्कँडलनं जम्मू-काश्मीर हादरलं होतं. याप्रकरणी सबिना नावाच्या एका महिलेला अटक करण्यात आली. ती या सेक्स स्कँडलची मुख्य सूत्रधार असल्याचं मानलं जातं. अनेक मोठे राजकारणी, उच्च अधिकारी आणि पोलीस अधिका-यांचीही नावं या प्रकरणात आली. महिला आणि अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ करून त्यांना वेश्याव्यवसायात लोटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सीबीआयने या प्रकरणाची चौकशी केली. आता हे प्रकरण पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 28, 2009 02:03 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 28, 2009 02:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close