S M L

भांडुपमध्ये चार वर्षांच्या चिमुरडीवर शाळेत बलात्कार

Sachin Salve | Updated On: Dec 17, 2014 04:25 PM IST

rape17 डिसेंबर : मुंबईतील भांडूपमधल्या माऊंट मेरी शाळेत चार वर्षांच्या चिमुरडीवर शाळेच्याच कर्मचार्‍याने बलात्कार केल्याची घटना उघड झालीये. पोलिसांनी या प्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतलंय. या प्रकारानंतर परिसरातील नागरिकांनी संतप्त होत शाळेत जाऊन तोडफोड केली. तसंच शाळेतलं साहित्य जाळण्याचाही प्रयत्न केला.

भांडुपमधील माऊंट मेरी या इंग्रजी माध्यमच्या शाळेत ही घटना घडलीये. पीड़ित मुलगी ही शाळेत असताना शाळेतील एका कर्मचार्‍याने शिक्षकांची नजर चुकवून तिला बाथरूममध्ये नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे करुन बलात्कार केल्याचं समोर येत आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून शाळेतील या नाराधमचा शोध घेण्यासाठी शाळेतील कर्मचार्‍यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेमुळे संतप्त नातवाईक आणि शाळेच्या परिसरातील नागरिकांनी शाळेत तोडफोड केली आणि साहित्य जाळण्याचाही प्रयत्न केला. पोलीस घटनास्थळी पोहोचताच हा जमाव पांगला. भांडूप पोलीस पुढील तपास करत आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 17, 2014 04:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close