S M L

डाळींचे भाव कडाडले : सरकार मात्र व्यापा-यांच्या पाठीशी

28 जुलै,डाळीच्या किंमती वाढलेल्या असताना 24 जुलैला परिपत्रक काढून पुरवठा विभागानं घाऊक आणि किरकोळ व्यापा-यांना डाळीच्या साठ्याची मर्यादा वाढवण्याची परवानगी दिलीय. त्यानुसार महानगर पालिका क्षेत्रात घाऊक व्यापा-यांना 6 हजार ऐवजी 10 हजार क्विंटल तर किरकोळ व्यापा-यांना 200 क्विंटल ऐवजी 500 क्विंटल पर्यंत डाळींचा साठा करायला परवानगी दिलीय. तर 'अ 'वर्ग नगरपालिका क्षेत्रात घाऊक व्यापा-यांना 8 हजार क्विंटल तर किरकोळ व्यापा-यांना 300 क्विंटल डाळींचा साठा करण्याची परवानगी दिलीय. त्यामुळं ऐन महागाईत सरकार साठेबाजीला प्रोत्साहन देतंय असं चित्र निर्माण झालंय.डाळींचे भाव गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कडाडलेच आहेत. एक नजर टाकूया सध्याच्या डाळींच्या दरांवर - नवी मुंबईतल्या घाऊक बाजारपेठेत डाळींचे 1 किलोचे भाव पाहिले तर तूरडाळ- 80 ते 85 रुपये, मुगडाळ- 65ते 70 रुपये, उडीदडाळ- 55 ते 60 रुपये किलो असून चणाडाळ- 30ते 35रुपये आहे. रिटेल दरांतही त्यामुळे वाढ झाली. तूरडाळ- 90 ते 100 रुपये किलो झाली असून, मुगडाळ-70 ते 75 रुपये, उडीदडाळ- 65 ते 70 रुपये, तर चणाडाळ- 30 ते 35 रुपये किलोनं मिळत आहे.नागपूरच्या बाजारपेठेतही डाळींचे भाव वाढलेलेच आहेत. तूरडाळ 78 ते 82 रुपये प्रती किलो झाली असून, मुगडाळ 58,उडीदडाळ 55 ते 57 रुपये, तर चणाडाळ 32-34रुपये प्रती किलो झाली आहे.अकोल्यातही तूरडाळीनं 88 रुपये प्रतिकिलोचा दर गाठलाय., मुगडाळ- 65, मसूरडाळ- 60, उडीदडाळ-56 तर चणाडाळ- 35रुपये प्रतिकिलो झालीये. महागाई आटोक्यात आणण्यासाठी डाळी आयात करण्याचे संकेत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. तर एकीकडे डाळींच्या किंमती वाढत असताना साठेबाजांवर कारवाई करण्याऐवजी सरकारच्या पुरवठा विभागानं अजब निर्णय घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 29, 2009 06:57 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 29, 2009 06:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close