S M L

आणखी 5700 गावं दुष्काळसदृश्य जाहीर होणार !

Sachin Salve | Updated On: Dec 17, 2014 07:07 PM IST

cm on _drought23417 डिसेंबर : राज्यात दुष्काळ परिस्थिती गंभीर असून 19 हजार गावांव्यतिरिक्त आणखी 5 हजार 700 गावं दुष्काळसदृश्य जाहीर करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय पाहणी पथकाकडे केलीये. तसंच दुष्काळीभागात स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.

राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्रात शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. गारपीटग्रस्त आणि दुष्काळी भागासाठी राज्य सरकारने 7 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. मात्र, केंद्राकडे राज्य सरकारने आणखी 3 हजार 925 कोटींची मागणी करण्यात आलीये. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून केंद्रीय पथक गारपीटग्रस्त भागाची पाहणी करत आहे. आज या पथकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी दुष्काळी मदतीचा अतिरिक्त प्रस्ताव या समितीला दिलाय. यात 19 हजार गावांव्यतिरिक्त आणखी 5 हजार 700 गावं दुष्काळसदृश्य जाहीर करण्याचीही विनंती केंद्राला करण्यात आलीय. तसंच पिण्याचं पाणी, चारा आणि गरज पडली तर स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आलीय. तसंच दुष्काळग्रस्तांसाठी राज्य सरकारनं केंद्रातकडे आणखी भरीव मदतीची मागणीही केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 17, 2014 07:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close