S M L

दहशतवादी कारवायांविरोधात हिंदूंनी एकत्र यावं -निलेश राणे

Sachin Salve | Updated On: Dec 17, 2014 09:04 PM IST

nilesh rane17 डिसेंबर : दहशतवादी कारवाया होत असताना हिंदूंना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करेन, कारण हिंदूच देशाचं रक्षण करू शकतात आणि दुसर्‍यांवर वचक ठेवू शकतात अशी मुक्ताफळं काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी उधळलीये. तसंच इतर धर्मातल्या लोकांना हिंदू धर्मात आणणं योग्यच आहे, असं म्हणत त्यांनी हिंदुत्ववादी संघटनांना पाठिंबा दिलाय.

सिडनीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया नोंदवल्यामुळे वाद निर्माण झालाय. भारतामध्ये जास्तीत जास्त लोकांना हिंदू धर्म स्विकारायला लावल्यास, सिडनीसारख्या दहशतवादी घटना टाळता येतील असं ट्विट राणे यांनी केलं होतं. ते एवढ्यावरच थांबले नाहीतर जास्तीत जास्त लोकांचे हिंदुंमध्ये धर्मांतर करण्यावर भर दिला पाहिजे असंही आणखी एक ट्विट केलंय. याबद्दल निलेश राणेंनी खुलासा केलाय. राणे म्हणतात, कोणीही हिंदू धर्म स्वीकारत असेल तर त्यात हरकत कुणाचीही नसावी. जर कुणी हरकत घेत असेल तर ती का असावी ? मुळात कुणी हिंदू धर्म स्वीकारतोय हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यामुळे याचा त्रास कुणालाही नसावा. मी एका हिंदू कुटुंबासोबत जात असेल तर त्यात चुकीचं काय आहे ? असा सवालच राणेंनी उपस्थित केला. तसंच जे काही दहशतवादी हल्ले होत आहे ते हल्ले हिंदूच रोखू शकतात, हिंदूच देशाचं रक्षण करू शकतात. आज जर हिंदू एकत्र आले तर ते दुसर्‍यावर वचक ठेवू शकतात असंही राणे म्हणाले. हे सांगताना हे माझं वैयक्तिक मत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं पण निलेश राणे यांनी जरी व्यक्तिगत मत असल्याचं म्हटलं असलं तरी पक्ष त्यांच्या या भूमिकेची कशी दखल घेतो, हे पाहावं लागेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 17, 2014 09:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close