S M L

हाफिझने पुन्हा गरळ ओकली, पेशावर हल्ल्यामागे मोदींचा हात !

Sachin Salve | Updated On: Dec 18, 2014 03:50 PM IST

hafiz saied17 डिसेंबर : पाकिस्तानामध्ये दडून बसलेल्या मुंबईवरील 26/11 चा हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि दहशतवादी हाफिझ सईदने पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. पेशावरचा हा हल्ला भारतानेच केल्याची बडबड सईदने केलीय. सईद एवढ्यावरच थांबला नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ नक्राश्रू ढाळत असल्याचीही टीकाही केलीये.

पाकिस्तानमध्ये पेशावर इथं एका आर्मीच्या शाळेवर तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात 150 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात 132 निष्पाप मुलांना ठार मारण्यात आलं. या घटनेचं अवघं जग निंदा करत असून सुन्न झालंय. निष्पाप मुलांच्या मृत्यूमुळे सर्वत्र दु:ख व्यक्त होतं आहे पण याला लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिझ सईद अपवाद ठरलाय. पाक या हल्ल्यातून अजून सावरला नाही तेच सईदने आपलं शहाणपण पाजण्यास सुरुवात केलीये. पेशावरमध्ये झालेला तालिबानी हल्ला हा भारतानेच केला असा जावाईशोध सईदने लावलाय. अमेरिकेच्या मोस्ट वॉन्डेट यादीवर असल्या हा सईद मात्र पाकमध्ये त्याला समाज सुधारक म्हणून ओळखलं जातं. पाकमधील कोणताही नेता सईदच्या विरोधात जाण्यास धाडस करत नाही. याच मुळे सईद पाकमध्ये बसून भारतावर हल्ल्याचे नियोजन करतो. पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत पाकच्या पाठीशी असल्याचं सांगत मैत्रीचा हात पुढे केला. मोदींनी मैत्रीचा हात पुढे केल्यामुळे सईदने गरळ ओकण्यास सुरूवात केली. पेशावरमध्ये हल्लामागे भारताचा हात आहे आणि नरेंद्र मोदी केवळ नक्राश्रू ढाळत असल्याची टीका सईदने केलीये. खरंतर पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना फोन करून दु:खात भारत तुमच्यासोबत असल्याचं सांगितलं होतं. आज भारतात संसदेपासून ते गल्लीबोळापर्यंत या हल्ल्यातील मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र आज पाकमध्ये झालेल्या एका सभेत बोलताना सईदने या हल्ल्याला मोदींनाच जबाबदार धरलं. तसंच आपण सर्वांनी एकत्र येऊन कट रचणार्‍यांना धडा शिकवला पाहिजे. भारतच या हल्ल्याला जबाबदार आहे याचा आम्ही बदला घेणार असा इशारा सईदने दिलाय. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच हाफीज सईदने भारतावर हल्ल्याची धमकी दिली होती. त्यानंतर पेशावरमध्ये तालिबान्यांनी शाळेवर हल्ला केल्याची घटना घडली आणि आता पुन्हा हाफीज सईद भारतालाच धमकी देतोय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 17, 2014 11:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close