S M L

हर्षवर्धन जाधवांची पोलीस निरीक्षकाला मारहाण

Samruddha Bhambure | Updated On: Dec 18, 2014 03:37 PM IST

हर्षवर्धन जाधवांची पोलीस निरीक्षकाला मारहाण

18 डिसेंबर : शिवसेनेचे कन्नड इथले आमदार हर्षवर्धन जाधव अडचणीत आले आहेत. शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी ठाकरे यांच्या सुरक्षेत तैनात एसपीयूचे पोलिस निरीक्षक पराग जाधव यांना मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आमदार जाधव यांच्याविरुद्ध उशिरारात्री मारहाणीचा गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या अटकेची शक्यता आहे.

हिवाळी अधिवेशन आणि उद्धव ठाकरे यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी पराग जाधव यांना तैनात करण्यात आले. नागपूरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल (बुधवारी) हॉटेल प्राइडमध्ये ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठक सुरू होती. 'यावेळी कोणालाही आता सोडायचे नाही', असे पोलिसांना सांगण्यात आले. काही वेळाने जाधव तेथे आले. त्यांनी आत सोडण्यासाठी आरडा-ओरड केली. पण, पराग जाधव यांनी त्यांना आत सोडले नाही. तेव्हा आमदार जाधव यांनी पराग जाधव यांना श्रीमुखात लगावली आणि तेथून निघून गेले.

या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान, अशी कोणतीही घटना घडली नाही. माझा कोणाशीही वाद झालेला नाही. ही केवळ अफवा आहे. आपल्याला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचं सांगत हर्षवर्धन जाधव यांनी आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 18, 2014 11:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close