S M L

मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम, राज्य सरकारला दणका

Samruddha Bhambure | Updated On: Dec 18, 2014 01:08 PM IST

मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम, राज्य सरकारला दणका

18  डिसेंबर :  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला आज (गुरुवारी) पुन्हा एकदा दणका बसला आहे. मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळत हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत सुप्रीम कोर्टात याचिका सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

राज्यात काँग्रेस सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला 16 टक्के तर मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात हायकोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाना आरक्षणाला स्थगितीचा निर्णय योग्य असल्याचे सांगत राज्य सरकारची याचिका फेटाळली आहे.

सुप्रीम कोर्टाने मुस्लीम आरक्षणालाही स्थगिती दिली, परंतु शिक्षणातील आरक्षणाच्या निर्णयाला धक्का लावला नाही. मुंबई हायकोर्टाने मुस्लिमांना शिक्षणात आरक्षण देणं मान्य केलं होतं. मुस्लिमांच्या सामाजिक उद्धारासाठी हे आरक्षण आवश्यक असल्याचं हायकोर्टाने म्हणलं होत. सुप्रीम कोर्टानेही यावेळी तोच निर्णय कायम ठेवला आहे.

दरम्यान, राज्य सरकार नव्यानं मराठा आरक्षणाचं विधेयक आणण्याच्या विचारात असल्याती माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यावर विनोद तावडेंच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय गटनेत्यांची आज दुपारी बैठक होणार आहे. आरक्षणासंदर्भात पुढील भूमिका ठरवण्यासंदर्भात ही बैठक होणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 18, 2014 12:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close