S M L

राज्य सरकार नव्याने मराठा आरक्षण विधेयक आणणार ?

Sachin Salve | Updated On: Dec 18, 2014 06:41 PM IST

cm on depcm3418 डिसेंबर : राज्य सरकार नव्यानं मराठा आरक्षणाचं विधेयक आणण्याच्या विचारात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी आज सर्वपक्षीय गटनेत्यांची  बैठक होणार आहे. या बैठकीत आरक्षणासंदर्भात पुढील भूमिका ठरवली जाईल.मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद तावडेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.

सुप्रीम कोर्टाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय देऊन मराठा समाजाला आरक्षण नाकारलंय. यामुळे राज्य सरकारला धक्का बसलाय. मुंबई हायकोर्टाने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्‍यांमध्ये आरक्षणाला स्थगिती दिली होती.

मात्र मुस्लिमांना शिक्षणात आरक्षण देणं मान्य केलं होतं. मुस्लिमांच्या सामाजिक उद्धारासाठी हे आरक्षण आवश्यक असल्याचं हायकोर्टाने नमूद केलंय. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 18, 2014 05:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close