S M L

बाळासाहेबांचं स्मारक शिवाजी पार्कजवळच ?

Sachin Salve | Updated On: Dec 18, 2014 05:32 PM IST

balasaheb4418 डिसेंबर : गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेलं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा प्रश्न आता मार्गी लागण्याची

शक्यता आहे. राज्य सरकारने स्मारकासाठी हालचाल सुरू केली असून शिवाजी पार्कजवळच बाळासाहेबांचं स्मारक उभारलं जाण्याची शक्यता आहे.

भाजपसोबत शिवसेना सत्तेत सहभागी होताच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य सरकारनं मुंबईतल्या चार जागांची चाचपणी सुरू केली आहे. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या नेतृत्त्वाखाली स्मारकासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या जागांची माहिती देणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन स्मारकाबाबतचा अंतिम निर्णय घेतील. चार जागांपैकी दोन जागा या दादर परिसरातील आहेत आणि शिवाजी पार्कच्या जवळ असलेल्या या दोन जागांवरच उद्धव ठाकरेंकडून शिक्कामोर्तब होईल, अशीही शक्यता व्यक्त होतेय. कारण शिवसेनेची स्थापना आणि बाळासाहेबांचे अंत्यसंस्कार शिवाजी पार्कवरच झाले आहेत.

या जागेवर होऊ शकत बाळासाहेबांचं स्मारक ?

- दादरमधील महापौर बंगल्याच्या परिसरातील दोन जागा

- परळच्या बॉम्बे डाईंगच्या वेअरहाऊसच्या परिसरात

- वडाळ्याच्या मिठागरांजवळ

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 18, 2014 05:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close