S M L

पाकचा दुटप्पीपणा, 26/11 हल्ल्याचा अतिरेकी मोकाट सुटला

Sachin Salve | Updated On: Dec 18, 2014 06:40 PM IST

पाकचा दुटप्पीपणा, 26/11 हल्ल्याचा अतिरेकी मोकाट सुटला

18 डिसेंबर : पाकिस्तानात पेशावरमध्ये दोनच दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांनी दहशतवादाचं समूळ उच्चाटन होत नाही, तोवर लढाई सुरूच ठेवणार असल्याचं म्हटलं होतं. पण, त्यांच्या या वक्तव्याला 24 तास उलटत नाही तोच भारताचा मुंबईतल्या 26/11 हल्ल्याचा आरोपी आणि लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी झकिऊर रहमान लख्वीला आज (गुरुवारी) पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी कोर्टाकडून जामीन मंजूर केला आङे. त्याच्यासोबत इतर 6 जणांनाही जामीन मंजूर करण्यात आला. त्यामुळे पाकिस्तानची भूमिका किती दुटप्पी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.

मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला सहा वर्ष पूर्ण झालीये. या हल्ल्यात जिवंत सापडलेला अतिरेकी अजमल कसाबला फाशीची शिक्षा झाली, तिला वरच्या कोर्टाने मंजुरी दिली आणि अंमलबजावणीही झाली. पण याच हल्ल्याचा खटला अजूनही पाकिस्तानात सुरू आहे. आणि सहा वर्षं उलटल्यानंतरही हा खटला कासवाच्या गतीने चाललाय आणि आज या खटल्याला धक्कादायक वळण मिळालं. 26/11 हल्ल्याचा आरोपी आणि लष्कर ए तोयबाचा अतिरेकी झकिऊर रहमान लख्वीला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी कोर्टाकडून जामीन दिलाय. त्याचसह इतर सहा जणांनाही जामीन दिलाय. पण ही तांत्रिक चूक असून या जामीनावर आक्षेप घेण्यासाठी वकिलांच्या संपामुळे कोर्टात कोणी हजर नव्हतं असा दावा पाकिस्तान सरकारकडून करण्यात आलाय. पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झकिऊरला जामीन द्यायला विरोध करू असा दावा पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केलाय. तसंच या दहशतवाद्यांना देशाबाहेर जाऊ देणार नाही, असाही दावा पाकिस्तानकडून करण्यात येतोय. दरम्यान, गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांना जाणूनबुजून जामीन मंजूर करण्यात आलाय. त्यांना काल मुद्दामच जामिनासाठी अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आलं. पेशावर हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये शोकाकु ल वातावरण असल्याचा गैरफायदा त्यांनी घेतलाय.

 26/11 हल्ला पाकिस्तानात खटल्याचा घटनाक्रम

- सुरुवातीला पाकिस्तानात हा खटला चालवण्यास कोर्ट स्थापन होत नव्हतं

- नंतर कोर्ट स्थापन झालं पण हा खटला चालवण्यास न्यायमूर्ती तयार नव्हते

- अखेर एक न्यायमूर्ती तयार झाले

- मात्र, त्यावेळी हा खटला चालवणार्‍या एका ज्येष्ठ वकिलांचा मृत्यू

- त्यानंतर एका वकिलाची हत्या

पाकिस्तानच्या तपासातील नावं

- हमद आमीन सादिक

- जकी-उर-रेहमान लख्वी

- मझहर इक्बाल

- अब्दुल वाजीद उर्फ जरार शहा

- शाहीद रियाज

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 18, 2014 06:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close