S M L

सार्वजनिक बांधकाम खात्यातल्या गैरव्यवहारांबद्दल छगन भुजबळ अडचणीत

Samruddha Bhambure | Updated On: Dec 19, 2014 02:52 PM IST

Chagan Bhujbal

19 डिसेंबर :  दिल्लीतल्या नवीन महाराष्ट्र सदन आणि इतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कंत्राटांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार झाल्याच्या आरोपप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची एसआयटी मार्फेत चौकशी करावी असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांच्या मुलगा पंकज भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ यांचीही चौकशी करावी असा अदेशही कोर्टाने दिला आहे.

या कंत्राटांमध्ये प्रामुख्याने दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामातील घोटाळ्यासह राज्यातील टोलनाके, रस्ते, वाहनतळ उभारणीच्या कामांतील गैरव्यवहार आदींचा समावेश आहे. एसआयटीने 28 फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करावा, असंही कोर्टाने आदेशात म्हटलं आहे. प्रस्तावित एसआयटीमध्ये अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणखी अडचणीत सापडले आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 19, 2014 12:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close