S M L

आघाडी सरकारने विदर्भावर अन्याय केला - मुख्यमंत्री

Samruddha Bhambure | Updated On: Dec 19, 2014 04:21 PM IST

cm devendra_fadanvis_news33

19 डिसेंबर : विदर्भाचा अनुशेष भरण्याची आणि विदर्भाचा विकास करण्याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची आहे. त्यामुळं येत्या काळात विदर्भातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज स्वतंत्र विदर्भाच्या चर्चेवेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विदर्भावरील अन्याय दूर करण्याचं आश्वासन दिलं आहे.

विधानसभेत आज पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाचा सूर उमटला. विधानसभेत सध्या विदर्भाच्या विकासावर चर्चा सुरू आहे. त्यावेळी विजय वडेट्टीवार, गोपालदास अगरवाल, आशिष देशमुख यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी केली. विदर्भातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्याही आमदारांनी वेगळ्या विदर्भाची मागणी केली. त्यावेळी वेगळ्या विदर्भाच्या घोषणेला काही आमदारांकडून अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देऊन प्रत्युत्तर देण्यात आलं.

वेगळ्या विदर्भाचा अशासकीय ठराव पुढे ढकलण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विकासाच्या मुद्यावर विदर्भावर सतत अन्याय झाल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी आक्रमकपणे विदर्भाची बाजू मांडली. राज्यकर्त्यांनी विदर्भाला सतत सापत्न वागणूक दिली. राज्यपालांचे निर्देश धुडकावून आघाडी सरकारनं विदर्भाचा पैसा दुसरीकडे वळवल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. विदर्भातल्या 102 अपूर्ण सिंचन प्रकल्पांचं काम पूर्ण करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यापुढे विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाला प्राधान्य देणार, त्यांची उपेक्षा होणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 19, 2014 04:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close