S M L

जयंत नारळीकर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार

Samruddha Bhambure | Updated On: Dec 19, 2014 08:20 PM IST

जयंत नारळीकर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार

19 डिसेंबर :   ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. 'चार नगरातील माझे विश्व' या त्यांच्या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. तर माधवी सरदेसाय यांच्या 'मंथन' या कोकणी लेखसंग्रहाला कोकणीतला सर्वोत्तम पुस्तकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

साहित्य अकादमीच्या वतीने पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली. नारळीकर यांच्या जन्मापासून वाराणसी, केंब्रिज, मुंबई आणि पुणे या चार शहरांमध्ये राहिले होते. या शहरांतील वास्तव्यावर आधारित असलेल्या या पुस्तकाची 'साहित्य अकादमी'साठी निवड करण्यात आली. नारळीकर यांनी याआधी अनेक विज्ञानकथा लिहिल्या आहेत. त्यामध्ये 'वामन परत न आला', 'व्हायरस', 'यक्षाची देणगी', 'याला जीवन ऐसे नाव', 'टाइम मशिनची किमया' या पुस्तकांचा समावेश आहे. 'यक्षाची देणगी' या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. नारळीकर यांना 'पद्मभूषण' आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 2010 मध्ये त्यांना 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार'ही मिळाला आहे.

दरम्यान, अजूनही वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगला पाहिजे असं आपल्या समाजाला वाटत नाही, असं मत नारळीकरांनी व्यक्त केलं आहे. मी विज्ञानप्रसाराचे थोडंफार काम केल आहे. प्रत्येकाने केलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 19, 2014 07:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close