S M L

कांगारूंची पुन्हा विजयी उडी, भारत पराभूत

Sachin Salve | Updated On: Dec 20, 2014 01:34 PM IST

कांगारूंची पुन्हा विजयी उडी, भारत पराभूत

ind_Vsaus220 डिसेंबर : पहिल्या कसोटीत जिंकता जिंकता हरल्यानंतर टीम इंडिया दुसर्‍या कसोटीत काही तरी बोध घेईल अशी अपेक्षा होती मात्र इथं पुन्हा पाढे पंचावनच झाले. ब्रिस्बेन टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 4 विकेटनं दणदणीत पराभव केला. भारताने ऑस्ट्रेलियाला दिलेलं 128 रन्सचं टार्गेट 24 व्या ओव्हरमध्ये पूर्ण करून विजय मिळवला.

आज चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या तुफानी मार्‍यापुढे भारताचे बॅट्समन तग धरू शकले नाहीत. भारतातर्फे शिखर धवननं 81 तर तळाला आलेल्या उमेश यादवनं 30 रन्स केले. पण विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि कॅप्टन धोणी झटपट आऊट झाले. रोहित आणि धोणीला तर भोपळाही फोडता आला नाही. मॅचच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं दुसर्‍या इनिंगमध्ये टीम इंडियाला 224 रन्समध्येच गुंडाळलं. पण भारतानं चांगली बॉलिंग करत मॅचमध्ये रंगत आणली. ऑस्ट्रेलियाच्या सहा विकेट घेत भारतानं टफ फाईट देण्याचा प्रयत्न केला खरा...पण ख्रिस रॉजर्सच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसरी टेस्टही जिंकलीये. या विजयाबरोबर आता सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाने 2-0 नं आघाडी घेतलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 20, 2014 01:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close