S M L

सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह बांधा, कोर्टाचे पालिकांना आदेश

Sachin Salve | Updated On: Dec 20, 2014 06:00 PM IST

सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह बांधा, कोर्टाचे पालिकांना आदेश

woman_toilet20 डिसेंबर : राज्यातील सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह बांधा असे आदेश मुंबई हायकोर्टाने सर्व महापालिकांना दिले आहेत. तसंच याबाबतचा आराखडा 31 मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहे.

स्वच्छतागृहांची कमतरता असल्यानं महिलांची कुचंबना होते. जी मोजकी स्वच्छतागृह आहेत ती अत्यंत घाण असतात. या सर्व असुविधांविरोधात पुण्याच्या मिळून 'सार्‍या जणी' या संस्थेनं जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी झाली.

कोर्टाने सर्व महापालिकांना सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह बांधा असे आदेश दिले आहे. याबाबतचा आराखडा 31 मार्चपर्यंत सादर करायलाही कोर्टाने सांगितलंय.

आपापल्या शहरांतील परिस्थिती लक्षात घेऊन योजना राबवा. ती स्वच्छतागृह मेंटेंन कशी केली जातील याबाबतही योजना आखताना काळजी घ्या अशा सुचनाही हायकोर्टाने केलीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 20, 2014 02:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close