S M L

शेतकर्‍यांना दिलासा, आडत आता होणार बंद

Sachin Salve | Updated On: Dec 20, 2014 09:49 PM IST

शेतकर्‍यांना दिलासा, आडत आता होणार बंद

adat20 डिसेंबर : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधलं संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर भाजप सरकारनं आता आणखी एक मोठा निर्णय घेतलाय. बाजार समित्यांमधील आडत आता होणार बंद आहे. आडत बंदचं परिपत्रक आजच जारी होण्याची शक्यता आहे. या निर्णयाला पणन संचालकांनी दुजोरा दिलाय.

शेतकर्‍यांना स्वत:चा माल विकताना 3 ते 6 टक्के आडत म्हणजेच दलाली द्यावी लागायची. वर्षभरात जवळपास 1500 कोटी रुपयांची आडत शेतकर्‍यांकडून वसूल केली जायची. आता ही पद्धतच बंद होणार असल्यानं आडत वसुलीला चाप बसणार आहे. आणि त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 20, 2014 09:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close