S M L

गेटवे ऑफ इंडिया आणि झवेरीबाजार बॉम्बस्फोटांची सुनावणी 6 ऑगस्टला

मुंबई 4 ऑगस्ट 25 ऑगस्ट 2003 ला मुंबईतील झवेरीबाजार आणि गेटवे ऑफ इंडिया जवळ झालेल्या बॉम्बस्फोटाची सुनावणी 6 ऑगस्ट पर्यंत पुढे ढकल्यण्यात आली आहे. याआधी झालेल्या सुनावणीत कोर्टानं महम्मद हनीफ सय्यद, त्याच्या पत्नी फमिदा आणि अशरद शमिक अन्सारी यांना दोषी ठरवलं होतं. त्यावर मंगळवारी शिक्षेची सुनावणी सुरु होती. सरकारी वकिलांनी बॉम्बस्फोटातील आरोपींना फाशी देण्यात यावी, अशी कोर्टाकडे मागणी केली. पण आरोपींनी मात्र आपल्यावरच्या सर्व आरोपांचा इन्कार करत, आपल्याला ही शिक्षा मंजूर नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 2003 मध्ये झालेल्या या स्फोटांमध्ये 53 जणांचा बळी गेला होता. हा खटला गेल्या सहा वर्षापासून सूरू आहे. तर महम्मद हनीफची मुलगी फरहीन, रिझवान लड्डूवाला, आणि शेख बॅटरीवाला यांना या प्रकरणातून मुक्त करण्यात आलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 4, 2009 11:08 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 4, 2009 11:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close