S M L

पुणे आणि साता-यात संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा लागू

5 ऑगस्टH1N1नं पुण्यातल्या रिदा शेखचा बळी घेतल्यानंतर आता सरकार खडबडून जागं झालं. पुणे आणि सातारा जिल्ह्यात H1N1 अलर्ट जारी करत सरकारने तिथे संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा लागू केलाय. तसंच खासगी हॉस्पिटल्ससाठीही मार्गदर्शक तत्त्वं जाहीर करण्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी केली. दरम्यान H1N1च्या पुण्यातल्या रुग्णांची संख्या 107 तर पाचगणीतल्या रुग्णांची संख्या 25 झाली आहे. 1897 साली पुण्यात प्लेगची साथ पसरल्यानंतर संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा लागू झाला होता. त्यानंतर अनेक वर्षांनी तो आता पुन्हा लागू झाला आहे. या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला H1N1ची लागण झाल्यास त्याला सक्तीने सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येईल. सध्या पुण्यात सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक सुरू आहे. शाळांमधला H1N1चा प्रसार कसा रोखता येईल याबाबत बैठकीत चर्चा सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 5, 2009 08:53 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2009 08:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close