S M L

पेशंटच्या नातईवाईकांनी केली रिक्षास्टँडची तोडफोड

Samruddha Bhambure | Updated On: Dec 21, 2014 06:43 PM IST

 पेशंटच्या नातईवाईकांनी केली रिक्षास्टँडची तोडफोड

21 डिसेंबर : पेशंटला न्यायला नकार देणाऱ्या रिक्षाचालकाला अद्दल शिकवायची म्हणून रिक्षा स्टँडवर तोडफोड करण्यात आली. कोल्हापूरमधल्या सदरबाजार परिसरात ही घटना घडली.

सदरबाजार परिसरातील एका 38 वर्षीय युवकाला हार्ट अटॅक आला होता. त्यावेळी त्याचे नातेवाईकांनी सुर्वेदिवाण रिक्षा स्टँडवरच्या रिक्षाचालकांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची विनंती केली. मात्र रिक्षाचालकाने त्यांना नकार देत ॲब्युलन्समधून घेऊन जाण्यास सांगितलं. या सर्व गोंधळात रुग्णाला हॉस्पिटलमध्ये न्यायला उशीर झाला आणि त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार समजताच संतप्त जमावाने सुर्वेदिवाण रिक्षा स्टँडवर जात तोडफोड केली. सध्या या भागात पोलीस बंदोबस्त तैनात असून रिक्षाचालकांनी या ठिकाणाहून आता पळ काढला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 21, 2014 06:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close