S M L

दोन दिवसात 'पीके'ची 50 कोटींची कमाई

Samruddha Bhambure | Updated On: Dec 21, 2014 07:20 PM IST

pk15-oct23

21 डिसेंबर :  मिस्टर परफेक्टशनिस्ट आमिर खानच्या 'पीके'ने केवळ दोन दिवसात 50 कोटींपेक्षाही अधिक गल्ला जमावला आहे.  राजकुमार हिराणी दिग्दर्शित आणि विधू विनोद चोप्राची निर्मिती असलेला 'पीके' शुक्रवारी प्रदर्शित झाला. 'पीके' हा या वर्षातील चौथा चित्रपट आहे ज्याने दोन दिवसात तिकीट बारीवर 50 कोटींपेक्षाही अधिक कमाई केली.

पहिल्याच दिवशी 'पीके'ने 26 कोटींच्यावर कमाई केली होती. दोन दिवसात या चित्रपटाने जवळपास 55 कोटी कमावले आहेत. या चित्रपटाची सर्वच स्तरातून वाह..वा! केली जात असून फिल्म समीक्षकांनी 'पीके'चं भरभरून कौतुक केलं आहे. शिवाय या सिनेमाची माऊथ पब्लिसिटीही भरपूर होत आहे. त्यामुळे 'पीके'साठी रांगा लागल्या आहेत. त्यात आज रविवार असल्याने 'पीके'च्या कमाईत आणखी भर पडणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 21, 2014 07:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close