S M L

मलाही टीबी झाला होता -अमिताभ बच्चन

Samruddha Bhambure | Updated On: Dec 22, 2014 12:22 PM IST

मलाही टीबी झाला होता -अमिताभ बच्चन

22 डिसेंबर : मी स्वत: टीबीमुळे त्रस्त होतो अशी कबुली बिग बींनी पहिल्यांदाचं सार्वजनिक ठिकाणी दिली आहे. मात्र वेळेत उपचार घेऊन टीबीवर मात केल्याचंही अमिताभ बच्चन यांनी सांगितंल. 'टीबी हारेगा, देश जितेगा' या अभियानाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिग बी अमिताभ बच्चन उपस्थित होते.

'टीबी हारेगा, देश जितेगा' हे ब्रीदवाक्य असलेल्या मोहिमेसाठी प्रशासनाने शॉर्ट फिल्म्स बनवल्या आहेत. बिग बींच्या धीरगंभीर आवाजातील या फिल्मचं काल जे.डब्ल्यू.मॅरिएटमधल्या कार्यक्रमात उद्घाटन करण्यात आलं. मुंबई महापालिकेकडून अमिताभ बच्चन यांना या मोहिमेचे ब्रॅन्ड ऍम्बेसिडर करण्यात आलं आहे.

यावेळी बोलताना, बिग बी म्हणाले, 'केबीसी' नुकताच सुरू झाला होता आणि मला अशक्तपणा जाणवू लागला. तपासणीत टीबी झाल्याचे समोर आले. माझी जीवनशैली पाहता, हा आजार होईल असे वाटले नव्हते. मात्र, त्यावर वेळीच उपचार केल्यास तो पूर्णत: बरा होतो. मी दिवसाला 10 ते 12 गोळ्या खाल्ल्या. उपचाराने तो बरा होऊ शकतो. देश टीबी मुक्त करण्यासाठी मी या मोहिमेत सहभाग घेतला आहे, असं बिग बी म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 22, 2014 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close