S M L

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार

Sachin Salve | Updated On: Dec 22, 2014 05:18 PM IST

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार

nagpur_congress22 डिसेंबर : शेतकर्‍यांच्या प्रश्नी फडणवीस सरकार गंभीर नाही असा आरोप करत आज (सोमवारी) युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनावर मोर्चा काढला होता. मात्र या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. या लाठीमारात दोन कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले.

शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर युवक काँग्रेसनं विधानभवनावर मोर्चा काढला होता. बिशप कॉटन शाळेजवळ मोर्चा पोहचल्यानंतर बॅरिकेड्स तोडून कार्यकर्त्यांनी विधानभवनाच्या आत जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवले. मात्र, कार्यकर्त्यांनी त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीमार केला. पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने लाठीचार्ज झाला. केवळ हे काँग्रेसच आंदोलन आहे म्हणून लाठीचार्ज झाला असा आरोप काँग्रेसच्या युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांनी केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 22, 2014 05:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close